Sunday, August 10, 2014

रक्षाबंधन

दि. १० ऑगस्ट २०१४ रोजी विद्यार्थ्यांनी शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला.  सर्व मुलींनी शाळेतील मुलांना राखी बांधली. या प्रसंगी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आश्रमशाळेतील मुलांना संगणका  मार्फत विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व, केर-कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी या बद्दल LCD projector द्वारे  सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळविण्याचा वेगळा अनुभव या प्रसंगी घेतला.

आदिवासी दिन उत्साहात साजरा

          दि. ९ ऑगस्ट २०१४ रोजी आमच्या शाळेत  क्रांतिदिन व आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी " आदिवासी दिनाचा  विजय असो " अशा घोषणा देत टाकळी गावात प्रभात फेरी काढली.
तसेच आदिवासी दिना  निमित्त आद्य क्रांतीकारक वीर बिरसा मुंडा यांची जयंती चा कार्यक्रम शाळेत घेण्यात आला. या प्रसंगी इयत्ता ४ थी चा विद्यार्थी चि. सुनील सोमनाथ माळी याने विद्यार्थ्यांना वीर बिरसा मुंडा यांच्या बद्दल थोडक्यात माहिती सांगितली.
         या प्रसंगी शाळेचे प्राथ. मुख्याध्यापाक श्री टकले सर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच माध्य. मुख्याध्यापिका श्रीम. जोशी ताई यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच कार्याक्रमचे सूत्र संचालन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. किरण शिंदे सर यांनी केले. अतिशय  उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भरभरून ज्ञानाचा आनंद लुटला. सर्व शिक्षकांनी यात सहकार्य केले.


सहकाररत्न

आमच्या संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष
                   मा. श्री.  शंकरराव गेणुजी कोल्हे साहेब                    
                         
                                  आमच्या संस्थेचे तसेच  एकलव्य आदिवासी अनुदानित आश्रम शाळेचे
                                          कार्यकारी अध्यक्ष श्री. नितीन दादा कोल्हे साहेब   
                                   

संगणक वापरताना आमच्या शाळेतील विद्यार्थी


             आमच्या आश्रमशाळेतील आदिवासी समाजाचे विद्यार्थी पुस्तकी शिक्षणा बरोबरच संगणक शिक्षणाचे ज्ञान घेत आहेत. खरोखरच आमची हि आदिवासी मुले खूप हुशार आणि सर्जनशील आहेत. याचा प्रत्यय घेण्यासाठी आपण आमच्या आश्रम शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहू शकता.

स्वातंत्र्यदिन २०१९

स्वातंत्र्यदिन २०१९