आदरणीय मा. मंत्री श्री. शंकरराव गेणुजी कोल्हे साहेब यांनी कोपरगाव तालुका व परिसरातील आदिवासी समाजातील लोकांचे आयुष्य उज्वल करण्याची इच्छाशक्ती म्हणून त्यांनी आपल्या संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थे अंतर्गत हि आदिवासी आश्रमशाळा सुरु केली आहे. गेल्या १७वर्षात आमच्या या शाळेने यशाचे शिखर गाठण्याची जिद्द मनात ठेवलेली आहे आमच्या शाळेचे यश असेच बहरत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Saturday, November 15, 2014
Sunday, August 10, 2014
रक्षाबंधन
दि. १० ऑगस्ट २०१४ रोजी विद्यार्थ्यांनी शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम
साजरा केला. सर्व मुलींनी शाळेतील मुलांना राखी बांधली. या प्रसंगी
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आश्रमशाळेतील मुलांना संगणका
मार्फत विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व, केर-कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी
या बद्दल LCD projector द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळविण्याचा
वेगळा अनुभव या प्रसंगी घेतला.
आदिवासी दिन उत्साहात साजरा
दि. ९ ऑगस्ट २०१४ रोजी आमच्या शाळेत क्रांतिदिन व आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी " आदिवासी दिनाचा विजय असो " अशा घोषणा देत टाकळी गावात प्रभात फेरी काढली.
तसेच आदिवासी दिना निमित्त आद्य क्रांतीकारक वीर बिरसा मुंडा यांची जयंती चा कार्यक्रम शाळेत घेण्यात आला. या प्रसंगी इयत्ता ४ थी चा विद्यार्थी चि. सुनील सोमनाथ माळी याने विद्यार्थ्यांना वीर बिरसा मुंडा यांच्या बद्दल थोडक्यात माहिती सांगितली.
या प्रसंगी शाळेचे प्राथ. मुख्याध्यापाक श्री टकले सर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच माध्य. मुख्याध्यापिका श्रीम. जोशी ताई यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच कार्याक्रमचे सूत्र संचालन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. किरण शिंदे सर यांनी केले. अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भरभरून ज्ञानाचा आनंद लुटला. सर्व शिक्षकांनी यात सहकार्य केले.

Subscribe to:
Posts (Atom)
-
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्या आश्रमशाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला दि.१५ ऑगष्ट २०१७ रोजीचे क्षणचित्रे...
-
आमच्या संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. शंकरराव गेणुजी कोल्हे साहेब ...
-
बँक ऑफ बडोदा शाखा कोपरगाव यांच्या वतीने आमच्या आश्रमशाळेतील इयत्ता दहावीची गुणवंत विद्यार्थिनी कु. सोनाली निकम हिचा सत्कार कर...