Saturday, August 29, 2015

कलागुण

    आमच्या आश्रमशाळेतील  इयता ५ वी च्या वर्गातील चि. सतीश सुधाकर गोधडे याने वर्गात साध्या वहीच्या पानावर असे छान चित्र रेखाटून ते सुंदर अशा रंगात रंगविले. 

                           
                                                                                  ( मूळ चित्राला फक्त आकर्षक करण्यासाठी border केलेली आहे.)

रक्षाबंधन

दि. २९ ऑगस्ट २०१५ .

           दरवर्षीप्रमाणे आमच्या आश्रमशाळेत रक्षाबंधनाचा  कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संजीवनी अध्यापक विद्यालयाच्या छात्र  शिक्षकांनी शाळेत येऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. या प्रसंगी छात्र अध्यापकांनी विद्यार्थ्यांना राखी बांधून त्यांना खाऊचे वाटप केले. असा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सयुक्तिकरित्या संजीवनी अध्यापक विद्यालयाचे प्राध्यापक श्री. दरांगे सर व आश्रमशाळेचे शिक्षक श्री. शिंदे सर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे व्यवस्थापक श्री. जोशी सर , मुख्याध्यापिका श्रीम. जोशी ताई, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या  श्रीम. साळुंके तसेच दोन्ही  विद्यालायचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी श्रीम. धामणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले . तसेच सर्वांच्या आग्रहास्तव श्री. दरांगे सर यांनी "या जगण्यावर शतदा प्रेम करावे " व फुलो का तारो का" या गीतांचे आपल्या मधुर आवाजात सादरीकरण करून सर्व सभागृह मंत्रामुघ्ध करून टाकला. 











स्वातंत्र्यदिन २०१९

स्वातंत्र्यदिन २०१९