Sunday, February 22, 2015

शिवजयंती उत्साहात साजरी

दि. १९ फेब्रुवारी २०१५
   
            सालाबाद प्रमाणे आमच्या शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. जोशी व श्री टकले सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. तसेच इयत्ता  चौथी च्या विद्यार्थ्यानी शिव रायांची गाणी म्हटले व काही कविता सदर केल्या. त्यानंतर श्री शिंदे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात माहिती विद्यार्थ्यांना दिली. श्री लंगोटे सर यांनी शिवरायांच्या एका सच्च्या मावळ्याचे शिवरायांबद्दल असलेले प्रेम आणि निष्टा कशी होती या आशयाची " छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा" कविता सादर केली.
त्यानंतर अध्यक्षीय भाषण श्री टकले सर यांनी केले.मुख्याध्यापिका श्रीम. जोशी यांनी देखील विद्यार्थ्यांना बहुमोलाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक व शाळेतील सर्व कर्मचारी वृंद हजर होते. कार्यक्रमच सांगता " गोब्राम्हण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज कि जय " या जयघोषाने करण्यात आला...जय भवानी जय शिवाजी या जयघोषाने सर्व हॉल दणाणून गेला होता.

Tuesday, February 17, 2015

संजीवनी यंग युनिअन चा आमच्या आश्रमशाळेत अनोखा उपक्रम

दि. १५ फेब्रुवारी २०१५ (रविवार)
            संजीवनी यंग युनिअन च्या विद्यार्थ्यांनी आमच्या आश्रमशाळेत येउन विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक मोफत वाटप केले. इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. तसेच तसेच त्यांना गणिताची सूत्रे लक्षात राहावी , गणित अभ्यासणे सोपे जावे यासाठी गणित सूत्र आणि क्लुप्त्या यांची पुस्तके दिली. त्याचप्रमाणे विद्यार्थींना एकतेचे महत्व समजावून देण्यासाठी संगणकाच्या सहाय्याने विवध व्हिडीओज देखील त्यांनी दाखविले. कार्यक्रमाचे शेवटी यंग युनिअन च्या विद्यार्थ्यांनी शिर्डी साईबाबांच्या प्रसादाचे वाटप सर्व विद्यार्थ्यांना केले. या सर्व कार्यक्रमाचा  विद्यार्थ्यांनी भरभरून आनंद घेतला. या प्रसंगी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मा. श्री. आगरकर सर, शाळेचे व्यवस्थापक श्री. जोशी सर, मुख्याध्यापिका श्रीम. जोशी एम. व्ही., व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. शिंदे सर यांनी केले. सर्व शिक्षकांच्या वतीने  मुख्याध्यापिका श्रीम. जोशी ताई यांनी यंग युनिअन चे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या वतीने कु. दुर्गा व बालिका गायकवाड यांनी आभार मानले. यंग युनिअन च्या भावी कार्यास शाळेच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्यदिन २०१९

स्वातंत्र्यदिन २०१९